Tuesday 18 August 2020

एसपीडीएम महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय ई-लर्निंग कार्यशाळा संपन्न

शिरपूर येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी  एक दिवसीय ई लर्निंग कार्यशाळा रविवारी दि.१६ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एन.पटेल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ.एम.के.पटेल, उपप्राचार्य पीएसजीव्हीपीएम कॉलेज, शहादा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे उदघाटन झाले.

कोरोना महामारी काळात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यशाळा, वेबीनार चे आयोजन करून विद्यार्थ्यांना व पालकांना धीर देण्याचे काम एसपीडीएम महाविद्यालयाने केले असे असे मत डॉ.एम.के.पटेल यांनी मांडले. ऑनलाईन टीचिंग करत असतांना विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येणार नाही असा विश्वास प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे समन्वयक व प्रमुख वक्ते प्रा.लखन चौधरी यांनी गुगल क्लासरूमसाठी मोबाईलचा प्रभावीपणे वापर कसा करावा या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. देश पातळीवर ३३०० च्यावर विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस झूम व यूट्युब च्या माध्यमातून सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.पी.महिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.परेश पाटील यांनी केले, तर डॉ.संदीप चौधरी यांनी आभार मानले.  

कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.व्ही.पाटील, आयक्युएसी समन्वयक प्रा.डॉ.दिनेश भक्कड, प्रा.संदीप सोलंकी , प्रा.किशोर राजपूत, प्रा.व्ही बी.महाले, प्रा.डी.बी.सोनवणे, डॉ.शरद पाटील तसेच श्री.भुषण कुवर आदीचे सहकार्य लाभले.

Saturday 15 August 2020

एसपीडीएम महाविद्यालयात आत्मनिर्भर भारत या विषयावर राष्ट्रीय वेबिनार संपन्न

किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीएम कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरपूर च्या पदव्युत्तर वाणिज्य विभागातर्फे स्वातंत्र दिनानिमित्त दि.१५ ऑगस्ट २०२० रोजी आत्मनिर्भर भारत या विषयावर राष्ट्रीय वेबिनार घेण्यात आला. या वेबिनार साठी उद्याटक म्हणून प्राचार्य डॉ.पी.पी.छाजेड, प्रभारी अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉ.ए.जी.सोनवणे, उपप्राचार्य, आर.सी.पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर हे लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल उपस्थित होते.

प्राचार्य डॉ.पी.पी.छाजेड यांनी वेबीनार चे उद्घाटन करत 'आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत शेती, उद्योग, रोजगार, गृहनिर्माण, संरक्षण आणि बँका या सर्व क्षेत्रांना स्पर्श झाल्याचे सांगितले'. या आत्मनिर्भर योजनांचा परिणाम तत्काळ जाणवणार नाही, परंतु कामगार व शेतमजुरांसाठी केलेल्या विविध तरतुदीमुळे त्यांचे जीवनमान सुखकर होण्यास मदत होईल असे सांगितले.

प्रमुख वक्ते प्रा.डॉ.ए.जी.सोनवणे यांनी आत्मनिर्भर भारत योजनेची सविस्तर माहिती विशद केली. यात १२ मे २०२० रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या भाषणाचा सविस्तर आढावा घेतला. त्याचप्रकारे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १३ ते १७ मे २०२० या पाच दिवसात घोषित केलेल्या वेगवेगळ्या तरतुदींवर विवेचन केले व आत्मनिर्भर भारत योजनेमधील क्षेत्रनिहाय केलेल्या खर्चाच्या तरतुदींचे विश्लेषण केले. 
त्याचबरोबर डॉ. सोनवणे यांनी आत्मनिर्भर अभियान हे कोरोना सारख्या भीषण परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करेल असे प्रतिपादित केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी आशेचा किरण असून भविष्यात भारत जगाला दिशा देईल असे स्पष्ट केले. 

वेबिनार चे सूत्रसंचालन समन्वयक प्रा.डॉ.दिनेश भक्कड यांनी केले, तर आभार प्रा.आर.एस.पावरा यांनी मानले. या वेबीनार मध्ये राष्ट्रीय स्तरावरील सुमारे ७००च्या वर प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वेबिनार च्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील व डॉ.एम.व्ही.पाटील, आयक्युएसी समन्वयक डॉ.दिनेश भक्कड तसेच आयोजन समिती सचिव प्रा.आर.एस.पावरा यांनी काम केले.

Wednesday 12 August 2020

एसपीडीएम महाविद्यालयात आत्मनिर्भर भारत या विषयावर राष्ट्रीय वेबिनार

किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीएम कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरपूर, जि.धुळे आणि पदव्युत्तर वाणिज्य विभाग आयोजित

राष्ट्रीय स्तरीय वेबीनार (National Level Webinar)
आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat)
दिनांक १५ ऑगस्ट २०२०, दुपारी ४ वाजता

उद्याटक: प्राचार्य डॉ.पी.पी.छाजेड
प्रभारी अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

वक्ते: डॉ.ए.जी.सोनवणे
उपप्राचार्य, आर.सी.पटेल महाविद्यालय, शिरपूर जि.धुळे

खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरून नाव नोंदणी करावी. कोणतेही नोंदणी शुल्क नाही.

सहभागी प्रमाणपत्र २ दिवसांनंतर दिले जातील. अधिक माहितीसाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करावे.

आयोजक समिती
प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, प्रा.डी.बी.पाटील (उपप्राचार्य)
डॉ.एम.व्ही.पाटील (उपप्राचार्य), डॉ.दिनेश डी.भक्कड (आयक्युएसी समन्वयक), प्रा.आर.एस.पावरा (आयोजक सचिव)

एसपीडीएमचे प्रा.संदिप चौधरी यांना पीएचडी

शिरपूर येथील एसपीडीेएम महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक संदिप बी.चौधरी यांनी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत रसायनशास्त्र विषयात पीएचडी पदवी संपादन केली आहे.

प्रा.संदिप चौधरी यांनी “SYNTHESIS, CHARACTERIZATION AND BIOLOGICAL EVALUATION OF PYRAZOLES FROM CYCLIC IMIDES” याविषयावर संशोधन केले, त्यांना दोंडाईचा येथील रावल महाविद्यालय चे प्राध्यापक डॉ.एस.एस.राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच एसपीडीएम महाविद्यालयांतील प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांनी सहाय्यक मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.

प्रा.चौधरी यांना केव्हीपी संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, सचिव नानासाहेब निशांत रंधे, खजिनदार मा.आशाताई रंधे, विश्वस्त रोहित रंधे, सर्व विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.व्ही.पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ.दिनेश भक्कड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Friday 7 August 2020

डॉ.भदाणे यांच्या संशोधन प्रकल्पास कॉपीराइट मंजूर

शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीेएम महाविद्यालयातील गणित विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.प्रेमकिरण गोपाल भदाणे यांनी केलेल्या संशोधन प्रकल्पास केंद्र सरकारच्या कॉपीराइट ऑफिस, डिपार्टमेंट ऑफ प्रोमोशन ऑफ इंडस्ट्री इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, बौद्धिक संपदा भवन, नवी दिल्ली यांचेमार्फत कॉपीराइट मंजूर झालेले आहे.

त्यांनी केलेले संशोधन हे शेतकऱ्यांसाठी बहुमोल असे आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय युज ऑफ मॅथेमॅटिकल टुल मॅट्रिक्स फॉर फार्मर्स एग्रीकल्चर कमोडिटी मार्केट ऑफ बेस्ट प्राईस, या संशोधनाचा परिसरातील शेतकऱ्यांना उपयोग होऊन आपल्या मालाची फायदेशीर किंमत ठरवु शकतात व कोणत्या मार्केटला आपण माल विकला तर अधिक नफा मिळेल याचा अंदाज शेतकऱ्याला होऊ शकतो. 

त्यांनी केलेले संशोधन हे युजिसीचा ध्येय धोरणात्मक सामाजिक बांधीलकी नुसार आहे. प्रा.डॉ.भदाणे यांना केव्हीपी संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, सचिव नानासाहेब निशांत रंधे, खजिनदार मा.आशाताई रंधे, विश्वस्त रोहित रंधे व सर्व विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.व्ही. पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ.दिनेश भक्कड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

एसपीडीएम महाविद्यालयाच्या ऑनलाइन लेक्चरचे प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांच्या हस्ते उद्घाटन

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे लेक्चर कोरोना महामारी मुळे वर्गात घेऊ शकत नाही, तसेच शासन व विद्यापीठाच्या नियमानुसार  एसवाय व टीवाय चे ऑनलाइन वर्ग सुरू करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्यात आहेत. त्याअनुषंगाने एसपीडीएम महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या टीवाय बीकॉम चे ऑनलाइन लेक्चरचे उद्घाटन माननीय प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. 

उद्घाटन प्रसंगी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिक्षणाचे महत्त्व समजून देत, ऑनलाईन क्लासेसद्वारे सुद्धा ज्ञानार्जन केले जाऊ शकते हे समजून सांगितले. झुमच्या बेसिक पॅकेज वर ऑनलाइन लेक्चर घेण्यात येत आहे. 
दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी फिजिकल फिटनेस वर ऑनलाइन लेक्चर घेण्यात आला त्यामध्ये क्रीडा व शारीरिक विभागप्रमुख डॉ.एल.के.प्रताले व धरणगाव महाविद्यालयातील प्रा.दिपक पाटील यांनी मार्गदर्शन केले. 
त्याचबरोबर टीवाय च्या इन्कम टॅक्स आणि बिझनेस मॅनेजमेंट या विषयाचे लेक्चर डॉ.दिनेश भक्कड घेत आहे, झूम चा मीटिंग आयडी व पासवर्ड विद्यार्थ्यांना टाईमटेबल द्वारे अगोदरच देण्यात आला आहे, टीवायचे विद्यार्थी ऑनलाइन लेक्चर चे लाभ घेत आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी सुद्धा घेण्यात येत आहे.

Sunday 2 August 2020

Happy Friendship Day Poem by Dinesh Bhakkad (वही तो दोस्त है)

Happy Friendship Day Poem by Dr.Dinesh Bhakkad --- वही तो दोस्त है..

मुसीबत में जब सारी दुनिया मुँह फेर ले, पर कंधे से कंधा लड़ा के जो साथ खड़ा रहे,
वही तो दोस्त है…..

मुस्कुराता चेहरा देखकर सब सोचे कितना खुश है,  पर इन मुस्कुराहटों के पीछे का दर्द जाने,
वही तो दोस्त है…..

रिमझिम गिरती बारिश में एक प्याली चाय के साथ गपशप का दौर कभी खत्म ना हो, ऐसी सोच रखें,
वही तो दोस्त है…..

धर्म मजहब, जाति पाति, ऊंच-नीच की दीवारें, इन सब बातों के जो पार है, जिसे न रोके कोई दीवार है,

वही तो दोस्त है…..

हर एक रिश्ता अपेक्षाएं और उम्मीदों के बोझ तले दबा हुआ है, लेकिन निस्वार्थ भावनाओं से जो साथ निभाए, 

वही तो दोस्त है…..

ऐसे मेरे, सच्चे प्यारे, मुसीबतों में साथ निभाने वाले मेरे सभी दोस्तों को समर्पित

“वही तो दोस्त है” यह कविता डॉ. दिनेश भक्कड द्वारा स्वयं लिखित है…..


एसपीडीएम महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय ई-लर्निंग कार्यशाळा संपन्न

शिरपूर येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी  एक दिवसीय ई लर्निंग कार...