Saturday, 15 August 2020

एसपीडीएम महाविद्यालयात आत्मनिर्भर भारत या विषयावर राष्ट्रीय वेबिनार संपन्न

किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीएम कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरपूर च्या पदव्युत्तर वाणिज्य विभागातर्फे स्वातंत्र दिनानिमित्त दि.१५ ऑगस्ट २०२० रोजी आत्मनिर्भर भारत या विषयावर राष्ट्रीय वेबिनार घेण्यात आला. या वेबिनार साठी उद्याटक म्हणून प्राचार्य डॉ.पी.पी.छाजेड, प्रभारी अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉ.ए.जी.सोनवणे, उपप्राचार्य, आर.सी.पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर हे लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल उपस्थित होते.

प्राचार्य डॉ.पी.पी.छाजेड यांनी वेबीनार चे उद्घाटन करत 'आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत शेती, उद्योग, रोजगार, गृहनिर्माण, संरक्षण आणि बँका या सर्व क्षेत्रांना स्पर्श झाल्याचे सांगितले'. या आत्मनिर्भर योजनांचा परिणाम तत्काळ जाणवणार नाही, परंतु कामगार व शेतमजुरांसाठी केलेल्या विविध तरतुदीमुळे त्यांचे जीवनमान सुखकर होण्यास मदत होईल असे सांगितले.

प्रमुख वक्ते प्रा.डॉ.ए.जी.सोनवणे यांनी आत्मनिर्भर भारत योजनेची सविस्तर माहिती विशद केली. यात १२ मे २०२० रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या भाषणाचा सविस्तर आढावा घेतला. त्याचप्रकारे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १३ ते १७ मे २०२० या पाच दिवसात घोषित केलेल्या वेगवेगळ्या तरतुदींवर विवेचन केले व आत्मनिर्भर भारत योजनेमधील क्षेत्रनिहाय केलेल्या खर्चाच्या तरतुदींचे विश्लेषण केले. 
त्याचबरोबर डॉ. सोनवणे यांनी आत्मनिर्भर अभियान हे कोरोना सारख्या भीषण परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करेल असे प्रतिपादित केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी आशेचा किरण असून भविष्यात भारत जगाला दिशा देईल असे स्पष्ट केले. 

वेबिनार चे सूत्रसंचालन समन्वयक प्रा.डॉ.दिनेश भक्कड यांनी केले, तर आभार प्रा.आर.एस.पावरा यांनी मानले. या वेबीनार मध्ये राष्ट्रीय स्तरावरील सुमारे ७००च्या वर प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वेबिनार च्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील व डॉ.एम.व्ही.पाटील, आयक्युएसी समन्वयक डॉ.दिनेश भक्कड तसेच आयोजन समिती सचिव प्रा.आर.एस.पावरा यांनी काम केले.

1 comment:

Business Management - Scope of Management

Business Management - Scope of Management व्यवस्थापनाची व्याप्ती (Scope of Management) व्यवस्थापनाच्या विविध कार्यांमध्ये व्यापक आहे आणि त्य...