Tuesday 18 August 2020

एसपीडीएम महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय ई-लर्निंग कार्यशाळा संपन्न

शिरपूर येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी  एक दिवसीय ई लर्निंग कार्यशाळा रविवारी दि.१६ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एन.पटेल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ.एम.के.पटेल, उपप्राचार्य पीएसजीव्हीपीएम कॉलेज, शहादा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे उदघाटन झाले.

कोरोना महामारी काळात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यशाळा, वेबीनार चे आयोजन करून विद्यार्थ्यांना व पालकांना धीर देण्याचे काम एसपीडीएम महाविद्यालयाने केले असे असे मत डॉ.एम.के.पटेल यांनी मांडले. ऑनलाईन टीचिंग करत असतांना विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येणार नाही असा विश्वास प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे समन्वयक व प्रमुख वक्ते प्रा.लखन चौधरी यांनी गुगल क्लासरूमसाठी मोबाईलचा प्रभावीपणे वापर कसा करावा या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. देश पातळीवर ३३०० च्यावर विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस झूम व यूट्युब च्या माध्यमातून सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.पी.महिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.परेश पाटील यांनी केले, तर डॉ.संदीप चौधरी यांनी आभार मानले.  

कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.व्ही.पाटील, आयक्युएसी समन्वयक प्रा.डॉ.दिनेश भक्कड, प्रा.संदीप सोलंकी , प्रा.किशोर राजपूत, प्रा.व्ही बी.महाले, प्रा.डी.बी.सोनवणे, डॉ.शरद पाटील तसेच श्री.भुषण कुवर आदीचे सहकार्य लाभले.

1 comment:

एसपीडीएम महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय ई-लर्निंग कार्यशाळा संपन्न

शिरपूर येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी  एक दिवसीय ई लर्निंग कार...