कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तर्फे दि.20 जुलै ते 31 जुलै 2020 या कालावधीत ईउत्तमविद्या@केबीसीएनएमयू या समितीमार्फत ऑनलाईन टिचर्स ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता . या अंतर्गत ऑनलाईन लर्निंग या विषयावर चार चार दिवसाचे विद्याशाखानिहाय ट्रेनिंग प्रोग्राम घेण्यात आले. त्यामध्ये सर्वप्रथम विज्ञान शाखेसाठी 20 ते 23 जुलै, 24 ते 27 जुलै वाणिज्य, इंजिनीअरिंग, फार्मसी शाखेसाठी व 28 ते 31 जुलै दरम्यान कला, मानवविज्ञान, शिक्षणशास्त्र, शारीरिकशिक्षण शास्त्र व इतर विज्ञान शाखेसाठी घेण्यात आले.
सर्व प्राध्यापक तसेच सीएचबी प्राध्यापक यांनी सक्रिय सहभाग या कार्यक्रमात नोंदवला. वाणिज्य शाखेसाठी घेण्यात आलेल्या सहभागी प्राध्यापकांचे सादरीकरण या कार्यक्रमात दि.27 जुलै रोजी प्रा.डॉ.दिनेश भक्कड यांनी ऑनलाइन लेक्चर साठी व्हिडिओ कसे तयार करायचे यावर पीपीटी द्वारे सादरीकरण केले. त्यामध्ये पावर सोफ्ट फ्री स्क्रीन रेकॉर्डर या सॉफ्टवेअर बद्दल माहिती दिली. त्यांच्या सादरीकरणासाठी विविध प्राध्यापक व विद्यापीठातर्फे अभिनंदन करण्यात आले.
त्याचप्रमाणे कला शाखेसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात दि.31 जुलै रोजी प्राध्यापक डॉ.फुला बागुल, डॉ.एन.एस.डोंगरे, डॉ.मनीषा वर्मा तसेच उपप्राचार्य डॉ.एम.व्ही.पाटील यांनी सुद्धा ऑनलाइन टिचिंग बद्दल अनुभव सांगत मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.
अभिनंदन डॉक्टर दिनेश भक्कड सर तुमचे विविध उपक्रम ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही छान लोकांपर्यंत पोहोचवतात. अशीच प्रगती करीत राहा.आपल्या भावी यशस्वी वाटचालीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा....
ReplyDeleteThanks sir
ReplyDelete