शिरपूर येथील एसपीडीेएम महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक संदिप बी.चौधरी यांनी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत रसायनशास्त्र विषयात पीएचडी पदवी संपादन केली आहे.
प्रा.संदिप चौधरी यांनी “SYNTHESIS, CHARACTERIZATION AND BIOLOGICAL EVALUATION OF PYRAZOLES FROM CYCLIC IMIDES” याविषयावर संशोधन केले, त्यांना दोंडाईचा येथील रावल महाविद्यालय चे प्राध्यापक डॉ.एस.एस.राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच एसपीडीएम महाविद्यालयांतील प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांनी सहाय्यक मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.
प्रा.चौधरी यांना केव्हीपी संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, सचिव नानासाहेब निशांत रंधे, खजिनदार मा.आशाताई रंधे, विश्वस्त रोहित रंधे, सर्व विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.व्ही.पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ.दिनेश भक्कड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
Congratulations sir
ReplyDeleteCongratulations sir
ReplyDelete