Friday, 7 August 2020

डॉ.भदाणे यांच्या संशोधन प्रकल्पास कॉपीराइट मंजूर

शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीेएम महाविद्यालयातील गणित विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.प्रेमकिरण गोपाल भदाणे यांनी केलेल्या संशोधन प्रकल्पास केंद्र सरकारच्या कॉपीराइट ऑफिस, डिपार्टमेंट ऑफ प्रोमोशन ऑफ इंडस्ट्री इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, बौद्धिक संपदा भवन, नवी दिल्ली यांचेमार्फत कॉपीराइट मंजूर झालेले आहे.

त्यांनी केलेले संशोधन हे शेतकऱ्यांसाठी बहुमोल असे आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय युज ऑफ मॅथेमॅटिकल टुल मॅट्रिक्स फॉर फार्मर्स एग्रीकल्चर कमोडिटी मार्केट ऑफ बेस्ट प्राईस, या संशोधनाचा परिसरातील शेतकऱ्यांना उपयोग होऊन आपल्या मालाची फायदेशीर किंमत ठरवु शकतात व कोणत्या मार्केटला आपण माल विकला तर अधिक नफा मिळेल याचा अंदाज शेतकऱ्याला होऊ शकतो. 

त्यांनी केलेले संशोधन हे युजिसीचा ध्येय धोरणात्मक सामाजिक बांधीलकी नुसार आहे. प्रा.डॉ.भदाणे यांना केव्हीपी संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, सचिव नानासाहेब निशांत रंधे, खजिनदार मा.आशाताई रंधे, विश्वस्त रोहित रंधे व सर्व विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.व्ही. पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ.दिनेश भक्कड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Business Management - Scope of Management

Business Management - Scope of Management व्यवस्थापनाची व्याप्ती (Scope of Management) व्यवस्थापनाच्या विविध कार्यांमध्ये व्यापक आहे आणि त्य...