शिरपुर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीएम महाविद्यालयातील प्रा.डॉ.दिनेश भक्कड यांनी "मी, माझे विभाग व माझी शैक्षणिक प्रगतीपुस्तक" या कार्यक्रमाद्वारे १ तास ४२ मिनिटं लाईव्ह, न थांबता सादरीकरण केले. सदर कार्यक्रम दि.६ जुलै रोजी युटुब वर घेण्यात आला. त्यांनी त्यांच्या सर्व गुरुजनांना व विद्यार्थ्यांना हे कार्यक्रम समर्पित केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात घाबरून न जाता वेगवेगळ्या माध्यमातून कशा पद्धतीने ज्ञानार्जन केले जाऊ शकते हे याचे एक सुंदर उदाहरण या कार्यक्रमाद्वारे सर्वांना त्यांनी सांगितले.
डॉ. दिनेश भक्कड ६ जुलै च्याच रोजी २००९ मध्ये, कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांच्या आशीर्वादाने या महाविद्यालयात रुजु झाले होते.
म्हणून मागील ११ वर्षात जे वेगवेगळे कार्यक्रम महाविद्यालयात,
संस्था व महाविद्यालयच्या पाठबळावर राबविले, तसेच सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सहल असेल व इतर कार्यक्रमांमध्ये जो प्रतिसाद दिला, लाभला व इतर संशोधन कार्य असे सर्व एकत्रित १७० फोटोज् या कार्यक्रमात दाखविले. सदर लाईव्ह कार्यक्रमाचा ४०० मान्यवरांनी तसेच डॉ.भक्कड यांच्या वेगवेगळ्या राज्यांतील विद्यार्थ्यांनी लाईव्ह बघितले.
सदर कार्यक्रमाची रेकॉर्डिंग डॉ. दिनेश भक्कड या युटुब चॅनल वर आपन परत पाहू शकतात, सर्व फोटोज वर ते लाईव्ह विवेचन करत आहेत. लॉकडाऊन च्या काळात घरी बसून काही वेगळं करावं म्हणून असा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता.
कार्यक्रम यशस्वी राबविल्या बद्दल केविपी अध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय डॉ.तुषार रंधे, श्रीमती आशाताई रंधे, श्री.निशांत रंधे, श्री.रोहित रंधे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील, डॉ.एम.व्ही.पाटील तसेच मित्रपरिवारातून शुभेच्छा दिल्या जात आहे.
No comments:
Post a Comment