शिरपूर येथील एसपीडीेएम महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी संगणक व्यवस्थापन व कागदपत्र जुळवाजुळव या विषयावर दि.२९ फेब्रुवारी २०२० रोजी एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्री रोहित रंधे तसेच अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एस एन पटेल उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन उपप्राचार्य डॉ एम व्ही पाटील, उपप्राचार्य प्रा डी बी पाटील व नॅक समन्वयक डॉ डी डी भक्कड यांनी केले.
कार्यशाळेची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री रोहित रंधे यांनी कार्यालयात संगणकाचे महत्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ एस एन पटेल यांनी कार्यशाळेचे प्रस्ताविक मांडले व नॅक संदर्भात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ एम व्ही पाटील यांनी नॅक संदर्भात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भूमिका स्पष्ट केली. श्री एस एस तिरमले यांनी संगणकाचे ज्ञानाच्या आवश्यकते बाबत मत व्यक्त केले.
प्रथम सत्र नॅक समन्वयक डॉ डी डी भक्कड यांनी सांभाळले, त्यात संगणक मायक्रोसोफ्ट वर्ड एक्सेल या बद्दल माहिती दिली.
द्वितीय सत्रात कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण घेण्यात आले यामध्ये संगणक विभाग प्रमुख प्रा. संदीप सोलंकी यांनी मार्गदर्शन केले. तृतीय सत्राचे सुत्र श्री समीर सूर्यवंशी यांनी सांभाळले.
शेवटच्या सत्रात मार्गदर्शक म्हणून शिंदखेडा येथील प्रा.एस के जाधव उपस्थित होते, त्यांनी महाविद्यालयात परीक्षेचे, विद्यापीठाचे व इतर काम करत असताना संगणकाचा वापर कशा पद्धतीने प्रभावीपणे करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी आभार प्रदर्शन नॅक समन्वयक डॉ भक्कड यांनी मानले.
कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी कार्यालय अधीक्षक श्री एस एस तिरमले व वरिष्ठ लिपिक श्री एस एन निकम यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यशाळेत अनुदानित व विनाअनुदानित असे एकूण 40 शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment