शिरपूर येथील किविप्र संस्थेच्या एसपीडीएम महाविद्यालयातील आयक्यूएसी विभागाच्या वतीने दि.७ फेब्रुवारी २०२० रोजी एकदिवशीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संस्थेचे अध्यक्ष तसेच धुळे जि.प.चे अध्यक्ष मा.डॉ.तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली व कबचौ उमवि जळगाव चे प्रकुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.ए.बी.चौधरी, युजीसी केअर पुणे च्या डॉ. शुभदा नगरकर, कबचौ उमवि ज्ञान स्त्रोत केंद्राचे डॉ.चिकाटे, डॉ.समीर नारखेडे व संस्थेच्या कोषाध्यक्षा मा.आशाताई रंधे, संस्थेचे विश्वस्त मा.रोहित रंधे, व्यवस्थापन परिषद सदस्य मा.विवेक लोहार, प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांनी कार्यशाळेची गरज महत्त्व उद्दिष्टये सांगीतली. प्रमुख अतिथी प्रा.ए.बी.चौधरी म्हणाले आपण संशोधन युगात जगात जगत आहोत. संशोधन क्षेत्राकडे करिअरचे क्षेत्र म्हणून पाहिले पाहिजे. संशोधनात् योगदान देण्याबाबत शासन आग्रही आहे. संशोधन भावनेपेक्षा वास्तवाला महत्त्व देते. या प्रसंगी त्यांनी येणाऱ्या संशोधन धोरणाची माहिती दिली. प्र-कुलगुरू प्रा.माहुलीकर म्हणाले अभ्यास शाखा निहाय कार्यशाळा आयोजित करणार आहोत. त्यातून संशोधनाचा दर्जा उंचावण्याची भूमिका आहे. याप्रसंगी त्यांनी पीएच.डी.पदवी संदर्भात युजीसीच्या बदललेल्या धोरणांची व नियमांची सविस्तर माहिती दिली.
डॉ.समीर नारखेडे यांनी पीएच.डी. पदवीच्या नोंदणीपासून अधिसूचनेपर्यंतची ऑनलाईन पद्धतीची माहिती दिली, डॉ.शुभदा नगरकर यांनी संशोधन कुठल्या नियतकालिकात प्रसिद्ध करावे? इमपॅक्ट फॅक्टर म्हणजे काय? सायटेशन नंबर म्हणजे काय? संशोधनासंदर्भातील अयोग्य कृती यांची सविस्तर माहिती दिली.
डॉ.चिकाटे यांनी संशोधन दर्जेदार होण्यासाठी ते कॉपीमुक्त होण्यासाठी काय काळजी घ्यावी ? संदर्भ कसे नोंदवावेत? या संदर्भात तांत्रिक माहिती दिली.
कार्यशाळेसाठी विषेशकरून आयएमआरडीच्या प्राचार्या डॉ वैशाली पाटील, रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.एस.एस.राजपूत, फॉर्मसी कॉलेज चे प्राचार्य पाटील व विद्यापीठ परिक्षेत्रातून असे एकूण १६६ पीएच.डी. गाईड सहभागी झाले.
कार्यशाळेचा समारोप संस्थेचे सचिव मा.नानासो.निशांत रंधे यांच्या अध्यक्षते खाली पार पडला. कार्यशाळा यशस्वी व उपयुक्त ठरल्याचा अभिप्राय उपस्थित संशोधक मार्गदर्शकांनी दिला. उपप्राचार्य प्रा.दिनेश पाटील, डॉ.एम.व्ही.पाटील, कार्यालय अधिक्षक श्री.शालिक तिरमले यांचे सह विविध समिती सदस्य प्राध्यापकेतर बंधू भगिनी यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पाहुण्यांचा परिचय कार्यशाळेचे संयोजक डॉ.दिनेश भक्कड यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.सौ.विहिरे यांनी तर आभार डॉ भक्कड यांनी मानले.
No comments:
Post a Comment