येथील किविप्र संस्थेच्या एसपीडीएम महाविद्यालयातील आयक्यूएसी द्वारा एक दिवसीय नॅक रिलेटेड वर्क कल्चर डेव्हलपमेंट कार्यशाळा दि.४ मार्च २०२० रोजी प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व विश्वस्त मा.रोहित रंधे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या कार्यशाळेत साधन व्यक्ती मा. प्राचार्य डॉ नागनाथ धर्माधिकारी पुणे यांनी नॅक संदर्भातील बदल लेल्या तरतूदी, नॅकचे सात निकष व त्याची पूर्तता, नॅकची पूर्वतयारी, एसएसआर चे लेखन व कार्यपद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
नॅक संदर्भात महाविद्यालयाच्या आयक्यूएसीने केलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेऊन मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण कामगिरीच्या बळावर नॅकला आत्मविश्वास पूर्वक सामोरे जाणार असल्याचे सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासात प्राध्यापकांचे शंकानिरसण ही डॉ धर्माधिकारी यांनी केले.
आयक्युएसी समन्वयक डॉ.दिनेश भक्कड यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ.एम.व्ही.पाटील यांनी आभार मानले. उपप्राचार्य प्रा.दिनेश पाटील यांचे सह प्राध्यापक व प्राध्यापके तर बंधूभगिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment