मागील दशकात पीएचडी करणाऱ्या संशोधकात वाढ झालेली दिसून येते. भारतभर व महाराष्ट्रात अनेक विद्यापीठात पीएचडी संशोधक, आपले वेगवेगळया विषयांवर संशोधन कार्य करताना दिसतात. त्याच बरोबर एका संशोधनात असं निरीक्षणाचा आले की फक्त 15% संशोधक वेळेवर पीएचडी प्रबंध पूर्ण करतात. तसेच 20% संशोधक अतिरिक्त वेळ घेऊन पीएचडी प्रबंध पूर्ण करतात. 5% संशोधक विविध कारणांमुळे पीएचडी प्रबंध पूर्ण करत नाही व मध्येच सोडून देतात. सर्वात महत्त्वाचे 60% पीएचडी संशोधकांना, संशोधन कार्य करताना वेगवेगळ्या अडचणीं येतात व त्यांचे संशोधन कार्य अपुर्ण राहते.
म्हणूनच शिरपुर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेचे एसपीडीएम महाविद्यालयांतील संशोधक मार्गदर्शक प्रा.डॉ.दिनेश भक्कड यांनी अशा वेगवेगळ्या अडचणी लक्षात घेता संशोधकांसाठी सोप्या भाषेत संशोधन पद्धती व साहित्यिक सर्वेक्षण अशा महत्त्वाच्या विषयांवर व्हिडीओ लेक्चर तयार करून युट्युब वर अपलोड केले आहे.
तसेच याबरोबर माहिती विश्लेषण, गृहीतकृत्ये परीक्षण, SPSS अश्या अनेक विषयांवर व्हिडिओ तयार करणार आहे, तरी सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील, डॉ.एम.व्ही.पाटील, संशोधन विकास केंद्र समन्वयक डॉ.के.डी.धर्माधिकारी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment