जालना येथील आरएचव्ही स्कुल च्या दहावी १९९५ च्या ३० विद्यार्थ्यांचे त्यांच्या गुरुजनां सोबत संवाद ऑनलाईन माध्यमातून गुरुपौर्णिमा निमित्त घडून आले. कोराना सारख्या महामारीच्या काळात लॉकडाऊन मध्ये घरी बसून काम करत असताना या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पंचवीस वर्षे पूर्वीच्या शाळेच्या शिक्षकांसोबत संवाद साधला. आरएचव्ही शाळेतील सेवानिवृत्त विज्ञान विषय शिकवणारे जैन सर, हिंदी विषयाचे शिक्षक सय्यद आली सर तसेच मराठी विषयाचे शिक्षक मेश्राम सर या कार्यक्रमात सहभागी.
या ऑनलाइन संवाद कार्यक्रमात स्विझरलँड सह अनेक देशातील विद्यार्थी, गुजरात तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या उच्च पदावर कार्यरत विद्यार्थी आपल्या गुरुजनांचे मार्गदर्शन परत एकदा मिळवण्यासाठी उत्सुक होते.
या कार्यक्रमाचे आयोजन विक्रम टी चे संचालक भावेश पटेल, ओमप्रकाश चितलकर, पंकज झांजरी व प्रा.डॉ.दिनेश भक्कड यांनी घडवून आणले.
No comments:
Post a Comment