Tuesday, 21 July 2020

एसपीडीएम महाविद्यालयाच्या आयक्यूएसी तर्फे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न IQAC Workshop


येथील किविप्र संस्थेच्या एसपीडीएम महाविद्यालयातील आयक्यूएसी द्वारा एक दिवसीय नॅक रिलेटेड वर्क कल्चर डेव्हलपमेंट कार्यशाळा दि.४ मार्च २०२० रोजी प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व विश्वस्त    मा.रोहित रंधे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 
या कार्यशाळेत साधन व्यक्ती मा. प्राचार्य डॉ नागनाथ धर्माधिकारी पुणे यांनी नॅक संदर्भातील बदल लेल्या तरतूदी, नॅकचे सात निकष व त्याची पूर्तता, नॅकची पूर्वतयारी, एसएसआर चे लेखन व कार्यपद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

नॅक संदर्भात महाविद्यालयाच्या आयक्यूएसीने केलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेऊन मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण कामगिरीच्या बळावर नॅकला आत्मविश्वास पूर्वक सामोरे जाणार असल्याचे सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासात प्राध्यापकांचे शंकानिरसण ही डॉ धर्माधिकारी यांनी केले. 

आयक्युएसी समन्वयक डॉ.दिनेश भक्कड यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ.एम.व्ही.पाटील यांनी आभार मानले. उपप्राचार्य प्रा.दिनेश पाटील यांचे सह प्राध्यापक व प्राध्यापके तर बंधूभगिनी उपस्थित होते.

Monday, 20 July 2020

Two Research Methodology Video Lecture Uploaded (संशोधन पद्धती व साहित्यिक सर्वेक्षण व्हिडिओ लेक्चर)

         मागील दशकात पीएचडी करणाऱ्या संशोधकात वाढ झालेली दिसून येते. भारतभर व महाराष्ट्रात अनेक विद्यापीठात पीएचडी संशोधक, आपले वेगवेगळया विषयांवर संशोधन कार्य करताना दिसतात. त्याच बरोबर एका संशोधनात असं निरीक्षणाचा आले की फक्त 15% संशोधक वेळेवर पीएचडी प्रबंध पूर्ण करतात. तसेच 20% संशोधक अतिरिक्त वेळ घेऊन पीएचडी प्रबंध पूर्ण करतात. 5% संशोधक विविध कारणांमुळे पीएचडी प्रबंध पूर्ण करत नाही व मध्येच सोडून देतात. सर्वात महत्त्वाचे 60% पीएचडी संशोधकांना, संशोधन कार्य करताना वेगवेगळ्या अडचणीं येतात व त्यांचे संशोधन कार्य अपुर्ण राहते. 

म्हणूनच शिरपुर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेचे एसपीडीएम महाविद्यालयांतील संशोधक मार्गदर्शक प्रा.डॉ.दिनेश भक्कड यांनी अशा वेगवेगळ्या अडचणी लक्षात घेता संशोधकांसाठी सोप्या भाषेत संशोधन पद्धती व साहित्यिक सर्वेक्षण अशा महत्त्वाच्या विषयांवर व्हिडीओ लेक्चर तयार करून युट्युब वर अपलोड  केले आहे. 



       तसेच याबरोबर माहिती विश्लेषण, गृहीतकृत्ये परीक्षण, SPSS अश्या अनेक विषयांवर व्हिडिओ तयार करणार आहे, तरी सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील, डॉ.एम.व्ही.पाटील, संशोधन विकास केंद्र समन्वयक डॉ.के.डी.धर्माधिकारी यांनी केले आहे.

Saturday, 18 July 2020

एसपीडीएम महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न


शिरपूर येथील एसपीडीेएम महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी संगणक व्यवस्थापन व कागदपत्र जुळवाजुळव या विषयावर दि.२९ फेब्रुवारी २०२० रोजी एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्री रोहित रंधे तसेच अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एस एन पटेल उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन उपप्राचार्य डॉ एम व्ही पाटील, उपप्राचार्य प्रा डी बी पाटील व नॅक समन्वयक डॉ डी डी भक्कड यांनी केले.

कार्यशाळेची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री रोहित रंधे यांनी कार्यालयात  संगणकाचे महत्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ एस एन पटेल यांनी कार्यशाळेचे प्रस्ताविक मांडले व नॅक संदर्भात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ एम व्ही पाटील यांनी नॅक संदर्भात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भूमिका स्पष्ट केली. श्री एस एस तिरमले यांनी संगणकाचे ज्ञानाच्या आवश्यकते बाबत मत व्यक्त केले.
प्रथम सत्र नॅक समन्वयक डॉ डी डी भक्कड यांनी सांभाळले, त्यात संगणक मायक्रोसोफ्ट वर्ड एक्सेल या बद्दल माहिती दिली.

द्वितीय सत्रात कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण घेण्यात आले यामध्ये संगणक विभाग प्रमुख प्रा. संदीप सोलंकी यांनी मार्गदर्शन केले. तृतीय सत्राचे सुत्र श्री समीर सूर्यवंशी यांनी सांभाळले.

शेवटच्या सत्रात मार्गदर्शक म्हणून शिंदखेडा येथील प्रा.एस के जाधव उपस्थित होते, त्यांनी महाविद्यालयात परीक्षेचे, विद्यापीठाचे व इतर काम करत असताना संगणकाचा वापर कशा पद्धतीने प्रभावीपणे करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली.

कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी आभार प्रदर्शन नॅक समन्वयक डॉ भक्कड यांनी मानले.

कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी कार्यालय अधीक्षक श्री एस एस तिरमले व वरिष्ठ लिपिक श्री एस एन निकम यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यशाळेत अनुदानित व विनाअनुदानित असे एकूण 40 शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Tuesday, 14 July 2020

प्रा.डॉ दिनेश भक्कड यांचे गुरू पौर्णिमेनिमित्त दोन तास लाईव्ह कार्यक्रम संपन्न


शिरपुर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीएम महाविद्यालयातील प्रा.डॉ.दिनेश भक्कड यांनी "मी, माझे विभाग व माझी शैक्षणिक प्रगतीपुस्तक" या कार्यक्रमाद्वारे १ तास ४२ मिनिटं लाईव्ह, न थांबता सादरीकरण केले. सदर कार्यक्रम दि.६ जुलै रोजी युटुब वर घेण्यात आला. त्यांनी त्यांच्या सर्व गुरुजनांना व विद्यार्थ्यांना हे कार्यक्रम समर्पित केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात घाबरून न जाता वेगवेगळ्या माध्यमातून कशा पद्धतीने ज्ञानार्जन केले जाऊ शकते हे याचे एक सुंदर उदाहरण या कार्यक्रमाद्वारे सर्वांना त्यांनी सांगितले.
डॉ. दिनेश भक्कड ६ जुलै च्याच रोजी २००९ मध्ये, कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांच्या आशीर्वादाने या महाविद्यालयात रुजु झाले होते. 
म्हणून मागील ११ वर्षात जे वेगवेगळे कार्यक्रम महाविद्यालयात,
संस्था व महाविद्यालयच्या पाठबळावर राबविले, तसेच सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सहल असेल व इतर कार्यक्रमांमध्ये जो प्रतिसाद दिला, लाभला व इतर संशोधन कार्य असे सर्व एकत्रित १७० फोटोज् या कार्यक्रमात दाखविले. सदर लाईव्ह कार्यक्रमाचा ४०० मान्यवरांनी तसेच डॉ.भक्कड यांच्या वेगवेगळ्या राज्यांतील विद्यार्थ्यांनी लाईव्ह बघितले.

सदर कार्यक्रमाची रेकॉर्डिंग डॉ. दिनेश भक्कड या युटुब चॅनल वर आपन परत पाहू शकतात, सर्व फोटोज वर ते लाईव्ह विवेचन करत आहेत. लॉकडाऊन च्या काळात घरी बसून काही वेगळं करावं म्हणून असा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता.

कार्यक्रम यशस्वी राबविल्या बद्दल केविपी अध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय डॉ.तुषार रंधे, श्रीमती आशाताई रंधे, श्री.निशांत रंधे, श्री.रोहित रंधे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील, डॉ.एम.व्ही.पाटील तसेच मित्रपरिवारातून शुभेच्छा दिल्या जात आहे.

आरएचव्ही स्कुल १९९५ दहावीच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या गुरुजनांशी संवाद


जालना येथील आरएचव्ही स्कुल च्या दहावी १९९५ च्या ३० विद्यार्थ्यांचे त्यांच्या गुरुजनां सोबत संवाद ऑनलाईन माध्यमातून गुरुपौर्णिमा निमित्त घडून आले. कोराना सारख्या महामारीच्या काळात लॉकडाऊन मध्ये घरी बसून काम करत असताना या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पंचवीस वर्षे पूर्वीच्या शाळेच्या शिक्षकांसोबत संवाद साधला. आरएचव्ही शाळेतील सेवानिवृत्त विज्ञान विषय शिकवणारे जैन सर, हिंदी विषयाचे शिक्षक सय्यद आली सर तसेच मराठी विषयाचे शिक्षक मेश्राम सर या कार्यक्रमात सहभागी.

या ऑनलाइन संवाद कार्यक्रमात स्विझरलँड सह अनेक देशातील विद्यार्थी, गुजरात तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या उच्च पदावर कार्यरत विद्यार्थी आपल्या गुरुजनांचे मार्गदर्शन परत एकदा मिळवण्यासाठी उत्सुक होते.
या कार्यक्रमाचे आयोजन विक्रम टी चे संचालक भावेश पटेल, ओमप्रकाश चितलकर, पंकज झांजरी व प्रा.डॉ.दिनेश भक्कड यांनी घडवून आणले.

Student E-Learning Program

सभी विद्यार्थियों को सूचित करते हुए हर्ष हो रहा है की एसपीडीएम महाविद्यालय, शिरपुर की और से Student E-Learning Program आयोजित किया गया है |

नीचे दी गई लिंक पर क्लिक कर रजिस्ट्रेशन करे, यह कार्यक्रम निशुल्क लिया जा रहा है |

https://forms.gle/RxmBUHUw1VyZYSQx6

बाद मे Google Classroom Join कर सभी Six Modules के व्हिडिओ यथावकाश अपने समय अनुरूप देखे | Google Classroom मे दिये गये सभी Assignment जमा करे, उचित परिक्षण के बाद E-Certificate ई-मेल द्वारा भेजा जाएगा | Student E-Learning Program की अन्य जानकारी और सर्टिफिकेट का नमूना संलग्नित पत्रिका मे दिया गया है |

आयोजक
प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल
समन्वयक डॉ.डी.डी.भक्कड

Tuesday, 1 December 2015

Research Projects

Minor Research Project
Problems of Credit Co-op Societies of Dhule District and Importance of Computer in Banking Sector
Sponsored by UGC WRO,Pune File No.23-1660/10 (WRO) dated 22-09-2010        
Rs.85000/-           Completed

Major Research Project
Perception and Awareness of Electronic Banking: A Sustainable Mechanism for Rural Development, Sponsored by ICSSR New Delhi, File No.02/23/2013-14/RPR dated 24-12-2013             

Rs.500000/-        Ongoing       Completing Stage

Business Management - Scope of Management

Business Management - Scope of Management व्यवस्थापनाची व्याप्ती (Scope of Management) व्यवस्थापनाच्या विविध कार्यांमध्ये व्यापक आहे आणि त्य...